बारा महिन्यांची प्राचीन नावे

मंगळवार, 13 जुलै 2021 (23:33 IST)
बारा महिन्यांची प्राचीन नावे पुढीलप्रमाणे होती : 
1. मधू 2. माधव 3. शुक्र 4. शुची 5. नभसू 6. नभस्थ 7. इष 8. ऊर्ज 9. साहस 10. सहस्य 11. तपस् आणि 12. तपस्य.
 
सध्याची नावे याप्रमाणे आहेत: 
1. चैत्र 2. वैशाख 3. ज्येष्ठ 4. आषाढ 5. श्रावण 6. भाद्रपद 7. अश्विन 8. कार्तिक 9. मार्गशीर्ष 10. पौष 11. माघ 12. फाल्गुन. 
 
प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत पंधरवड्यास शुक्लपक्ष व त्यानंतर प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत पंधरवड्यास कृष्णपक्ष असे म्हणतात. याशिवाय सौरमानामध्ये चांद्रमासाच्या गणतीवरून जो एक मासाचा फेर पडत असे, त्यास योग्य काली अधिक मासात गणून 'संसर्प' या नावाने संबोधित असत. हल्ली त्यास 'अधिक मास' असे म्हणतो. 
 
('आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या पुस्तकातून साभार)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती