वसंत पंचमीचा इतिहास आणि साजरी करण्याची पद्धत

या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत.

वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.

वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात.

वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते.

वेबदुनिया वर वाचा