उशीवर बसणे नेहमी टाळावे, कारण....

शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (17:33 IST)
चांगली झोप येण्यासाठी आरामदायक उशीची आवश्यक असते. अनेक लोकांना डोक्याखाली उशी नसेल तर झोप येत नाही. उशीची उपयोगिता आणि अनिवार्यता पाहता यासंबंधी शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत.
 
शास्त्रानुसार मनुष्याला मिळणारे सुख-दुःख त्याच्या कर्माचे फळ असते. काही लोक नकळतपणे असे काही चुकीचे काम करून जातात, जे सामान्य असतात परंतु त्याचे महत्त्व खूप असते. जर एखाद्या मनुष्याला खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा मिळत नसेल तर, निश्चितच त्यामागे नकळतपणे त्याच्याकडून झालेले अधार्मिक कर्म असू शकतात.
 
जर एखाद्या व्यक्तीने नकळतपणे अपशकून केला असेल तर त्याचे अशुभ फळ त्याला भविष्यात नक्की मिळते. असाच अपशकुनाचा प्रकार उशीशी जोडला गेलेला आहे.
 
अनेक लोकांना उशीवर बसण्याची सवय असते. असे केल्याने त्यांना आरामदायक वाटते परंतु शास्त्रानुसार हे चुकीचे आहे. उशीवर बसल्यास विविध प्रकारचे अपशकून होतात. उशीवर बसल्याने आरोग्यासंबंधी अडचण निर्माण होऊ शकते तसेच धर्माशी संबंधित अशुभ फळ मिळण्याची शक्यता वाढते.
 
जर एखादा व्यक्ती नेहमी उशीवर बसत असेल तर ती उशी खराब होते आणि आरामदायक राहत नाही. अशा उशीवर डोके ठेवून झोपणाऱ्या व्यक्तीला शांत झोप लागत नाही. अनेकवेळा अशुभ स्वप्न पडण्याची शक्यता असते. अनिद्रा, डोकेदुखीचा त्रास आणि मानसिक तणाव निर्माण होऊ शकतो.
 
झोप पूर्ण न झाल्यामुळे आरोग्यासाबंधी त्रास होतो. जर शरीरीला पाहिजे तेवढा आराम मिळाला नाही तर व्यक्ती चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. यामुळे धनहानी होण्याची शक्यता वाढते. धार्मिक मान्यतेनुसार उशीवर बसणाऱ्या व्यक्तीवर लक्ष्मीची अवकृपा होते.

वेबदुनिया वर वाचा