या वर्षी हनुमान जयंतीमध्ये फारच विशेष योग आहे. चैत्र शुक्ल पक्ष पौर्णिमाच्या दिवशी हनुमानाचा जन्म झाला होता. आणि 4 वर्षानंतर या वर्षी हनुमान जयंती चंदग्रहणापासून मुक्त राहणार आहे. यंदा हनुमान जयंती 11 एप्रिल, मंगळवारी येत आहे.
ज्योतिषाचार्य प्रमाणे हनुमान जयंतीत राज योगासोबत शुक्र मीन राशीत उच्चाचे झाले आहे ज्याची सूर्य राशीसोबत युती होईल. द्वितीय स्थानात मेष राशीच्या मंगळ शुभ फलदायी ठरेल. विशेष योग असल्यामुळे हनुमान जयंती भक्तांसाठी विशेष फलदायी राहणार आहे. असा संयोग पूर्ण 120 वर्षांनंतर येत आहे. हा योग सर्वांसाठी शुभ साबीत होऊ शकतो.
ज्योतिषीप्रमाणे यंदा हनुमान जयंतीवर त्रेता युग सारखा संयोग बनत आहे. या दिवशी मंगळवार आणि पौर्णिमा व चित्रा नक्षत्र आहे. शास्त्रानुसार हनुमानाच्या जन्माच्या वेळेस हाच संयोग होता असे मानले जाते. त्याच सोबत या दिवशी गजकेसरी आणि अमृत योग लागत आहे. ज्यांच्या पत्रिकेत साडेसाती आहे. त्यांच्यासाठी या दिवशी पूजा करणे शुभ ठरेल.
आता 4 वर्षांनंतर बनेल असा संयोग
ज्योतिषीनुसार ज्या जातकांना शनीची साडेसाती सुरू आहे त्यांनी ह्याचे निवारण याच दिवशी करावे, कारण असा संयोग 4 वर्षांनंतर येईल.