गुरु पौर्णिमा मंत्र : या 4 मंत्रांचा जप करा, पुण्य कमवा

शुक्रवार, 23 जुलै 2021 (10:08 IST)
गुरु पौर्णिमा हा गुरुपूजनाचा दिवस आहे, परंतु गुरुची प्राप्ती तितकी सोपी नाही. जर गुरुची प्राप्ती झाली असेल तर श्री गुरु पादुका मंत्र घेण्याचा प्रयत्न करा. गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु पादुकाची पूजा करावी. गुरुला भेट द्यावी. नैवेद्य, वस्त्र इतर अर्पण करावं, त्यांना दक्षिणा द्यावी आणि त्यांची आरती करा आणि त्यांच्या चरणी बसून आशीर्वाद घ्यावा.
 
जर तुम्हाला गुरूच्या जवळ जाण्याची संधी मिळत नसेल तर त्यांची छायाचित्रे, पादत्राणे मिळवल्यानंतर त्याची उपासना करा. कोणत्याही गुरु मंत्रांचा सतत जप केल्यास गुरु होण्याचे पुण्य मिळू शकते. हे मंत्र गुरूची उपासना करण्यासाठीही उत्तम आहेत.
 
1. ॐ गुरुभ्यो नम:।
 
2. ॐ गुं गुरुभ्यो नम:।
 
3. ॐ परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:।
 
4. ॐ वेदाहि गुरु देवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नौ: गुरु: प्रचोदयात्।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती