खांडवी

ND
साहित्य : 1/2 कप बेसन, 3/4 कप दही व पाणी, 1 लहान चमचा साखर, 1/4 चमचा हळद, 1 चिमटी हिंग, 1/2 लहान चमचा आलं व हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ चवीनुसार.

कृती : वर दिलेल्या सर्व साहित्याला चांगले प्रकारे कालवून घ्यावे. व त्या मिश्रणाला 10 मिनिट चांगले शिजवावे, त्यात गाठी नको पडायला हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नंतर एका ट्रेमध्ये तेल लावून त्यात हे मिश्रण पसरवून गार झाल्यावर त्याचे लांब लांब काप करावे. वरून किसलेलं नारळ, गाजर व कोथिंबीर टाकावे. प्रत्येक पट्टीचे रोल तयार करावे.

फोडणी : तेल गरम करून त्यात कढी पत्ता घालून फोडणी तयार करून ही फोडणी प्रत्येक रोल वर टाकून सर्व्ह करावी.

वेबदुनिया वर वाचा