भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, कांतीलाल यांना मोरबीतून, भूपेंद्र पटेल घाटलोडियातून रिंगणात

गुरूवार, 10 नोव्हेंबर 2022 (12:20 IST)
गांधीनगर- भाजपने गुरुवारी 160 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने विजय रुपाणी, नितीन पटेल यांच्यासह 38 जणांची तिकिटे कापली आहेत.
 
पक्षाने 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात होणाऱ्या 89 जागांसाठी आणि 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांपैकी 76 जागांसाठी 84 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत 14 महिला, 13 अनुसूचित जाती आणि 24 अनुसूचित जमातींचा समावेश आहे.
 
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना घाटलोडियातून तर क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा यांना जामनगर उत्तरमधून रिंगणात उतरवण्यात आले आहे.
 
मोरबी येथील भाजपच्या विद्यमान आमदाराचे तिकीट कट करण्यात आले आहे. कांतीलाल अमृत येथून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. माजी आमदार कांतीलाल यांनी मोरबी येथे नुकत्याच झालेल्या पूल दुर्घटनेत 130 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने लोकांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली होती.
 
राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती