आजपासून देशात 'नमो'युग; नवाझ शरीफ येणार

सोमवार, 26 मे 2014 (10:56 IST)
भाजप नेते नरेंद्र मोदी आज (सोमवार) सायंकाळी सहा वाजता देशाचे 15 पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा भव्य सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या सोहळ्याला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होणार आहेत. तीन हजारांहून अधिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  

नरेंद्र मोदी  हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान ठरतील. मोदींसह आज 30 ते 35 मंत्री शपथ घेतील. मोदींनी आज सकाळी साडेसात वाजता राजघाटवर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर आदरांजली वाहिली. सायंकाळी सहा वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी पार पडल्यानंतर मोदी प्रथमच पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान 7 रेसकोर्स येथ रवाना होणार आहेत.

भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने देशात तब्बल तीस वर्षांनंतर स्थीर सरकार स्थापन होत आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सार्क देशांचे प्रतिधिती उपस्थित राहणार आहेत.

संभाव्य मंत्रीमंडळ पुढीलप्रमाणे....
राजनाथसिंह - गृहमंत्री
अरुण जेटली अर्थमंत्री
सुषमा स्वराज- परराष्ट्रमंत्री
रविशंकर प्रसाद- कायदामंत्री
स्मृती इराणी‍- माहिती- प्रसारण
नितीन गडकरी- नागरी वाहतूक
व्यंकय्या नायडू- रेल्वे मंत्री
डॉ. हर्षवर्धन-  आरोग्यमंत्री
गोपीनाथ मुंडे- कृषीमंत्री
मनेका गांधी- पर्यावरण मंत्री
व्ही.के. सिंह - सरंक्षण मंत्री


याशिवाय उमा भारती, पीयुष गोयल, कलराज मिश्र, सत्यपाल सिंह, हसंराज अहिर, अनुराग ठाकूर, मुख्यार अब्बास नक्वी, दिलीप गांधी, रावसाहेब दानवे, नरेंद्रसिंह तोमर, अंनतकुमार किरीट सोमय्या,  रामविलास पासवान, रामदास आठवले, पी ए संगमा, अनंत गिते आदी नेत्यांचा समावेश होणार आहे.

वेबदुनिया वर वाचा