सुरेश कलमाडी म्हणाले, 'मी कमनशिबीच ठरलो'

गुरूवार, 17 एप्रिल 2014 (15:30 IST)
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे मी कमनशिबीच ठरल्याची खंत पुण्याचे विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांनी व्यक्त केली आहे. मात्र, बहुचर्चित 'आदर्श घोटाळ्याप्रकरणातील आरोपी असलेले काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी मिळाल्याने ते नशीबवान ठरल्याचेही कलमाडी यांनी टोला लगावला आहे.

सुरेश कलमाडींनी आज (गुरुवारी) पुण्यात मतदान केल्यानंतर आपल्या मनातील खंत बोलून दाखवली. पुण्यात उत्साहात मतदान सुरु आहे. विविध केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतील घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडी यांना डच्चू देवून काँग्रेसने विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली आहे.  कलमाडी यांनी कदम यांना पाठिंबा दर्शविला आहे. 

वेबदुनिया वर वाचा