मोहन रावले स्वगृही परतले;राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

बुधवार, 16 एप्रिल 2014 (11:34 IST)
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या हकालपट्टी करण्‍याचे आल्याने राष्ट्रवादीत गेलेले माजी खासदार मोहन रावले पुन्हा स्वगृही अर्थात शिवसेनेत परतले आहे. शिवसेना माझा प्राण असून भगव्या झेंड्याशिवाय राहु शकत नसल्याचे रावले यांनी गिरगाव येथील सभेत सांगितले. शरद पवार यांच्यावर नाराज होऊन परत आलेलो नसल्याचेही रावलेंनी यावेळी स्पष्ट केले.

मोहन रावले म्हणाले, शिवसेनेत परत येत असताना पवारांना फोन केला आणि शिवसेना माझा प्राण आहे, भगव्या झेंड्याशिवाय मी राहू शकत नाही असे सांगितले. पवारांनीही कोणतीही हरकत न दर्शवता माझा मार्ग मोकळा केला. अरविंद सावंत यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची जाहीर सभा घेण्‍यात आली यावेळी रावले यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला.

दरम्यान, शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यांनंतर रावले मनसेत जातील, असे अंदाज बांधले जात होते. मात्र, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत मोहन रावले यांनी गेल्या 21 मार्चला अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मात्र अवघ्या महिनाभरातच रावले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्‍ठी दिली.

मोहन रावले हे बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात. शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी तब्बल पाच वेळा दक्षिण मध्य मुंबईतून खासदारकी मिळवली होती. मात्र गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

वेबदुनिया वर वाचा