पैसे वाटण्यावरून काँग्रेस-मनसेत जुंपली

बुधवार, 16 एप्रिल 2014 (13:04 IST)
पुण्यातील रास्ता पेठेत मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. कारण काँग्रेसच्या उमेदवारासाठी पैसे वाटण्याचे काम भारती विद्यापीठाचे काही कर्मचारी करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रास्तापेठेत धाव घेतली, पैसे वाटणार्‍याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या उमेदवारांनी रास्ता पेठेत पोलिस स्टेशनमध्ये गर्दी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. या दरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल झाल्याचेही समजते. काँग्रेसकडून याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा