जय देव जय देव जय वक्रतुंडा ।

WD
जय देव जय देव जय वक्रतुंडा ।
सिंदुरमंडित विशाळ सरळ भुजदंडा ।।जय।।धृ।।

प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीला ।
रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सतार सुस्वर गायन शोभित अवलीला ।।जय।।1।।

सारीगमपधनीसप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ।
तातक् तातक् ‍थैय्या करिसि आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ।।जय।।2।।

अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभित शुभवदना ।
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करी भ्रमणा ।।जय।।3।।

वेबदुनिया वर वाचा