Hartalika teej 2019 : दांपत्य जीवनात प्रेम वाढवण्यासाठी हरितालिका तृतीयेवर अमलात आणा हे सोपे उपाय

भाद्रपद मासाच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरितालिका व्रत ठेवलं जातं. विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित स्त्रिया योग्य वर प्राप्तीसाठी हे व्रत करतात. या दिवशी महिला निर्जल व्रत करून महादेव, देवी पार्वतीची वाळू किंवा मातीचे तयार मूर्तीची पूजा करतात. या दिवशी सुखी दांपत्य जीवनासाठी देवी पार्वतीला प्रसन्न केल्याने जीवनात आनंद वाढतो... जाणून घ्या खास 10 उपाय....
 
1. तांदळाची खीर तयार करून देवी पार्वतीला नैवेद्य दाखवावं. यानंतर पतीला खीर खाऊ घालावी. पत्नीने दुसर्‍या दिवशी व्रत सोडल्यावर नैवेद्य ग्रहण करावं.
 
2. 11 नवविवाहित स्त्रियांना शृंगार पेटी भेट करावी. 16 शृंगाराच्या वस्तू असल्या पाहिजे.
 
3. 5 वयस्कर सवाष्णींना साडी आणि जोडवे द्यावे. जोडप्याने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा.
 
4. सकाळी लवकर उठून अंघोळ करून महादेवाच्या मंदिरात जावं. मंदिरात महादेव- पार्वतीला लाल गुलाब अर्पित करावे.
 
5. महादेव आणि नंदीला मध अर्पित करावे.
 
6. देवी पार्वतीला साडी किंवा चुनरी आणि नथ आपल्या हाताने घालावी.
 
7. या दिवशी पतीने शुभ मुहूर्तात बायकोची मांग भरावी. जोडवी आणि पैंजण घालून द्यावी. याने पती- पत्नी यांच्यात प्रेम वाढतं.
 
8. हरितालिका तृतीयेच्या दिवशी गणपती मंदिरात कोरडे मालपुए अर्पित केल्याने दांपत्य जीवनात गोडवा येतो.
 
9. या दिवशी पत्नीने स्वत:च्या हाताने विडा लावून महादेवाला अर्पित करावा आणि नंतर आपल्या पतीला द्यावा. याने प्रेम वाढतं.
 
10. गुळाचे 11 लाडू देवी पार्वतीला अर्पित करावे आणि दुसर्‍या दिवशी श्री गणेश चतुर्थीला गणपती स्थापना केल्यानंतर प्रसाद म्हणून ग्रहण करावे.

ALSO READ: कहाणी हरतालिकेची

ALSO READ: हरतालिका तृतीया, शुभ मुहूर्त, पूजा विधी, महत्त्व

ALSO READ: !! श्री हरीतालिका संपूर्ण पूजन विधी !!

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती