सगळ्यांचे लाडके दैवत गणरायाला आज मोठ्या थाटात निरोप दिला जात आहे. त्यात पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीचे सगळ्यांनाच अप्रुप असते. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पुण्याच्या महापौरांच्या हस्ते पुजा झाल्यानंतर मानाच्या गणपतींची मिरवणूक सुरू झाली.