मयूरेश पुराणातील एक गोष्ट आहे. पार्वतीकडे विश्वदेव नावाचा एक अतिथी आला. पार्वतीने त्यास नमस्कार करून जेवायला बसविले. तेवढय़ात त्यांच्या लक्षात आले की, आपण विष्णुतीर्थचे दर्शन घेतले नाही. तो तसाच पानासमोर बसून राहिला. गणेशाने विष्णूचे रूप घेऊन त्याला दर्शन दिले. भोजन झाल्यावर विश्वदेवाला त्यांच्या मनातील भेदाभेद वृत्ती जाणण्यासाठी एका बालकाची गणेशाने गोष्ट सांगितली.