देवावर विश्वास असेल तर आपल्या घरात आपण अनेक मुर्त्यांची स्थापना करतो, त्याची दररोज पूजा करतो. त्यामुळे नक्कीच
मनाला शांतता मिळते. पण, या मूर्त्या झाडांपासून बनवण्यात आल्या असतील तर मनाच्या शांततेशिवाय त्याचे आणखी बरेच फायदे तुम्हाला मिळू शकतात.
आपल्या घरात प्रत्येक नव्या कामाची सुरूवात करताना गणेशाची पूजा केली जाते. देवघरातील ही मूर्ती लिंबाच्या झाडापासून बनविलेली असावी, कारण...
पुढे पहा लिंबाच्या गणेशाचं महत्त्व
WD
लिंबाच्या गणेशाचं महत्त्व
गणेश उत्सवाच्या काळात घरात अशा प्रकारच्या गणपतीची स्थापना करणे शुभ मानण्यात येते.
तंत्रशास्त्रात अनेक वनस्पतींचा देखील वापर केला जातो. तंत्रशास्त्रानुसार जर घरात लिंबाच्या झाडापासून बनवलेली गणेश मूर्तीची स्थापना केल्यास घरात सुख-शांती राहण्यास मदत होते.
एखाद्या विशिष्ट कामासाठी बाहेर जात असाल तर पहिले लिंबाच्या झाडापासून बनवलेल्या श्रीगनेशाच्या मूर्तीचे दर्शन घ्या. कार्यात अवश्य यश मिळेल.
गणेशोत्सव दरम्यान एखाद्या रात्री लाल फूल आणि चंदनाने गणपतीची पूजा करा तसेच ओम गं गणपतये नम: मंत्राच एक हजार वेळेस जप करावा. नंतर त्या गणपतीच्या मूर्तीला नदीत प्रवाहित करावे. असे केल्याने थांबलेली कामे होण्यास मदत होते.
घरात कुणाला कोणत्याही प्रकारची बाधा झाली असेल तर, या चमत्कारीक मूर्तीमुळे त्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. या मूर्तीमुळे धनासंबधी अडचण कधीच जाणवणार नाही.