चैत्र महिन्यात 'वासुदेव' रूपी गणपतीची उपासना करून सुवर्ण दक्षिणा दिली पाहिजे. वैशाखात 'कर्षण' रूपी गणपतीची उपासना करून शंख दान केले पाहिजे. ज्येष्ठ महिन्यात गणपतीला फळे दान केली पाहिजेत. या महिन्यात गणपतीची आरती 'सतीव्रत' या नावावर केली जाते. आषाढात 'अनिरूद्ध' रूपी गणपतीची आरती करून संन्यासी व्यक्तीला तूंबी-पात्र दान केले पाहिजे. श्रावणात 'बहुला गणपती' पूजा केली पाहिजे. भाद्रपद महिन्यात 'सिद्धी विनायका' ची पूजा करणे आवश्यक आहे. आश्विन महिन्यात 'कपर्दीश' गणपतीची पूजा पुरूषांनी केली पाहिजे. कार्तिक महिन्यात चार सवंत्सरापर्यंत पालनीय व्रताचा विधी आहे. पौष महिन्यात 'विघ्ननायक' गणपतीची आणि माघ महिन्यात 'संकटव्रत' घेवून त्याची पूजा केली पाहिजे. फाल्गुन महिन्यात 'ढुंढीराज' व्रत करण्याची प्रथा आहे. मंगळवारी चतुर्थी आली तर तिला 'अंगारकी चतुर्थी' असे म्हणतात. ती विशेष फलदायक असते. रविवारी चतुर्थी आली तर विशेष फळ देणारी असते.