दरवर्षीप्रमाणे गौरीशंकर गणपती दहा दिवसासाठी विराजमान असतील. हा पाहुणा सर्वांच्या घरात वेगेवेगळ्या रूपात येतो. एखाद्या मूर्तीच्या हातात लाडू तर दुसरीने पगडी परिधान केलेली असते. काही मूर्ती उंदरावर बसलेल्या तर काही आरामात मांडी घालून बसलेल्या असतात. गणपती बाप्पाच्या येण्याने लहान-थोरांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो. अनेक नावे धारण केलेल्या गणपतीची पूजा प्रत्येक शुभ कार्याच्या अगोदर केली जाते. हे असे आराध्य दैवत आहे की त्याच्याशिवाय कोणत्याचा कार्याचा प्रारंभ होऊ शकत नाही.