दिवस तो ऋषिपंचमी चा निवडला

रविवार, 23 ऑगस्ट 2020 (09:01 IST)
दिवस तो ऋषिपंचमीचा निवडला,
समाधिस्थ होण्या,  योगी शांत जाहला,
झाले किती दुःखी, झाले किती भावुक,
हरली आता सर्वांची शेगावी तहान भूक,
हसले ते चैतन्य, म्हणाले न करावी चिंता,
हाक मारा मजसी तुम्ही, मी येईल तिथं स्वतः,
आले अनुभव त्यानंतर कितीतरी जना,
दिला दृष्टांत गजाननाने, अनेक जणांना,
वास तयांचा जाणवतो तिथं, गेल्यास वारीला,
परब्रह्म भेटतो निश्चित, वारकरीला,
निष्ठा मात्र पाहिजेत सबळ, हे मात्र खरे,
भेटती महाराज सकळा, मार आधी तू हाक रे !
 
....अश्विनी थत्ते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती