हरितालिका तृतीया व्रत कैवल्य 2020 आणि कामाच्या 12 गोष्टी जाणून घेऊ या

मंगळवार, 18 ऑगस्ट 2020 (14:52 IST)
हरितालिका तृतीया व्रत भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या पुनर्मिलनच्या स्मरणार्थ साजरे केले जाते. यंदाच्या वर्षी हे शुभ व्रत 21ऑगस्ट 2020 रोजी येत आहे. 22 ऑगस्टला श्री गणेशाची स्थापना होणार आहे. हरितालिका तृतीया व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. लग्नायोग्य मुलींना इच्छितावरची प्राप्ती होते. चला वाचू या, या व्रताच्या काही 12 खास गोष्टी...
 
1 हरितालिका तृतीयेच्या उपवासात पाणी घेतले जात नाही. उपवासानंतर दुसऱ्या दिवशी पाणी ग्रहण केले जाते.
2 हरितालिका तृतीया उपवास करताना याला सोडण्याची पद्धत नसते. दरवर्षी हे व्रत कैवल्य विधी-विधानाने केले पाहिजे.
3 हरितालिका तृतीयेच्या उपवासाच्या दिवशी रात्री जागरण केले जाते. रात्री भजन कीर्तन करावं.
4 हरितालिका तृतीयेचा उपवास कुमारिका, सवाष्ण बायका करतात तसेच शास्त्रात किंवा आपल्या धर्मग्रंथात विधवा बायकांना देखील हा व्रत करण्याची परवानगी आहे.
5 हरितालिका तृतीयेला माता पार्वती आणि भगवान शंकराची विधी विधानाने पूजा केली जाते.
6 हरितालिका तृतीया व्रत प्रदोषकाळात केले जाते. सूर्यास्तानंतरचे तीन मुहूर्ताला प्रदोषकाळ म्हटले जाते. हे दिवस आणि रात्र यांचा भेटण्याचा काळ असतो.
7 हरितालिका पूजेसाठी भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान गणेशाची वाळूमातीची आणि काळ्या चिकणमातीच्या मूर्ती हाताने बनवावी.
8 पूजेच्या ठिकाणी फुलांनी सजवून एक चौरंग ठेवा आणि त्या चौरंगावर केळ्याची पाने ठेवून भगवान शंकर, देवी पार्वती आणि भगवान गणेशाची मूर्ती ठेवावी.
9 या नंतर देवांचे आव्हान करून भगवान शिव, देवी पार्वती आणि भगवान श्रीगणेशाची षोडशोपचार पूजा करावी.
10 सौभाग्याचा सर्व वस्तू एका ताटलीत ठेवून देवी पार्वतीला अर्पण करण्याची प्रथा आहे.
11 या मध्ये शंकराला धोतर आणि पंचा अर्पण करतात. यामधील सर्व सौभाग्याचं लेणं सासू किंवा सवाष्ण बाईच्या पायापडून ब्राह्मणा दान म्हणून द्यावी. 
12 अश्या प्रकारे पूजा केल्यानंतर कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावं. आरती केल्यावर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही -भात कानवाल्याचा नैवेद्य दाखवावा.
 
कथा:
हरितालिका तृतीया व्रत कैवल्य भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या पुनर्मिलन स्मरणार्थ साजरे केले जाते. एक पौराणिक कथेनुसार देवी पार्वती ने भगवान भोलेनाथाला पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. हिमालयात गंगेच्या काठावर तहान-भूक हरपून तपश्चर्या केली. देवी पार्वतीची अशी दशा बघून त्यांचा वडिलांना महाराज हिमालय यांना खूप दुःख झाले. एके दिवशी महर्षी नारद भगवान विष्णूंकडून पार्वतीशी लग्नाची मागणी घेऊन येतात. देवी पार्वतीला हे कळल्यावर त्यांना फार वाईट वाटले आणि त्या दुःख करू लागतात.
 
एका मैत्रिणीने विचारल्यावर त्या सांगतात की, त्या भगवान शिव पती म्हणून प्राप्त व्हावे म्हणून ही तपश्चर्या करीत आहे. आपल्या मैत्रिणींच्या सांगण्या वरून त्या अरण्यात गेल्या आणि तिथेच भगवान शिवाच्या पूजेमध्ये हरपून गेल्या. या दरम्यान भाद्रपदातील शुक्ल किंवा शुद्ध पक्षातील तृतीयेला हस्त नक्षत्रात देवी पावतीने वाळूने शिवलिंग बनविले आणि भोलेनाथाच्या पूजेमध्ये लीन होऊन रात्री जागरण केलं. आई पार्वतीची कठोर तपश्चर्या बघून भगवान शिवाने त्यांना दर्शन दिले आणि पार्वतीच्या इच्छेनुसार त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले.
 
तेव्हा पासून चांगल्या पतीच्या इच्छेसाठी आणि पती दीर्घायुषी व्हावा या साठी कुमारिका आणि सवाष्ण बायका हरितालिका तृतीयेचा उपवास करतात आणि भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा करून आशीर्वाद मिळवतात.
 
शुभ मुहूर्त :
हरितालिका तृतीयाची पूजेची वेळ - सकाळी 5 वाजून 54 मिनिटा पासून सकाळी 8 वाजून 30 मिनिटा पर्यंत.
संध्याकाळी हरितालिका तृतीया पूजेची वेळ : संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटांपासून रात्री 9 वाजून 6 मिनिटा पर्यंत.
तृतीया तिथी प्रारंभ - 21 ऑगस्टच्या रात्री 2 वाजून 13 मिनिटांपासून
तृतीया तिथी समाप्ती - 22 ऑगस्ट रात्री 11 वाजून 2 मिनिटा पर्यंत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती