आला तो महीना अन तो मुहूर्त आला,
बाप्पा आपल्या सर्वांच्या घरी विराजमान झाला.
उत्साह नसानसांत वाहतो आहे सर्वांच्या,
विघ्नविनायक आले क्षण असें भाग्याचा.
घराघरांचे जाहले देऊळ,नाद एकच कानी,
झटकून जाईल मरगळ, तो निनाद ऐकुनी,
बुद्धीची देवता ही, कनवाळू असें खुप,
घरोघरी दिसतील आता त्यांचे वेगवेगळे स्वरूप.
मी ही जाईन रंगून भक्तीत तुझ्या रे गजानना,
हात कृपेचा असुदे मजवर, हीच मनी कामना!