'गणपतये स्वाहा' पासून गणपतीस आहूती अर्पित करण्याचा मंत्र कृष्ण यजुर्वेदीय कण्वसंहितेशिवाय (२४/४२) कृष्ण यजुर्वेदीय मैत्रायणीसंहिते (३/१२/१३) मध्येही आढळतो.
शुक्ल युजर्वेदातही (२२/३०) 'गणपतये स्वाहा' ने आहुति देण्याचा संदर्भ आहे. बृहत्पाराशर स्मृतित शुक्ल यजुर्वेदात (२३/१९) 'गणानां त्वा... हवामहे' या मंत्रासोबत स्वाहा वगळून हवन करण्यास सांगण्यात आले आहे. ऋग्वेदात (१०/११२/९) 'निषुसीद गणपतये.... मधवञ्चित्रमचां' ही ऋचा प्राप्त होते. यामध्ये सदकार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासंबंधी गणपीची प्रार्थना केली आहे. शुक्ल यजुर्वेदात (३३/६५-७२) 'आ तू न... ' आठ मंत्र गणपतीस अर्पित करण्यात आले आहेत. ऋग्वेदातही (८/८१/१) जवळपास सारखेच मंत्र सापडतात-
'आ तू न इन्द्र क्षुमन्तं ग्रामं सं गृभाय।' कृष्ण यजुर्वेदीय मैत्रायिणी संहितेत गणेशाच्या खालील गायत्रीचा उल्लेख आहे.
'ॐ तत्कराटाय विघ्नहे हस्तिमुखाय धीमहि। तन्नो दन्ती प्रचोदयात्।'
अथर्ववेदाच्या शौनकी संहितेत वरिल मंत्र 'एक दन्ताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि। तन्नौ दन्ती प्रचोदयात।' अशा स्वरूपात आढळतो.
शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन संहितेत (१६/२५) आणखी एक मंत्र आढळतो.
कृष्ण यजुर्वेदाच्या तैत्तरीय-आरण्यकात गणेश गायत्री मंत्र खालील प्रकारे आढळतो-
तत्पुरुषाय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि।
तन्नौ दन्ती प्रचोदयात।'
याव्यतिरिक्त अथर्ववेदाच्या गणेशपूर्वतापन्युपनिषदात (११५) खालील मंत्र आढळतो-
'गणानां त्वा गणनाथं सुरेन्द्र... सीदं शश्वत।'
अथर्ववेदाच्या गणेश उत्तरतापिनी उपनिषदात गणेश मंत्र भिन्न स्वरूपात आढळतो-
'गणानां त्वा गणपतिम् । सप्रियाणां... प्रचोदयात।'
'बृहतजाबाल उपनिषद', 'गणपति उपनिषद', 'हेरम्ब उपनिषद' यासारख्या ग्रंथामध्ये श्री गणेशाचा उल्लेख आढळतो. अतिंमत: वेदांमध्ये श्री गणेशाचा उल्लेख आढळतो, असे निर्विवादपणे म्हणता येते.