गणपती, विघ्नहर्ता श्री गणेश सर्वप्रथम पूज्य आहे. श्री गणपतीच्या स्तुतीमुळे भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात.
तसं तर संपूर्ण वर्षभर आणि खास करून प्रत्येक बुधवारी गणपतीची पूजा केली पाहिजे पण श्री गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशीपर्यंत राशीनुसार गणपतीची पूजा केल्याने त्याचे शुभ फल मिळतात.
पहा कशी करावी आपल्या राशीनुसार गणपतीची पूजा-अर्चना...
WD
मेष राशीच्या व्यक्तीने गणपतीला पूजेत रेशमी ओढणी व्हायला अर्पित करायला पाहिजे. असे केल्याने दांपत्य जीवनातील प्रेमळ संबंधात वाढ होते आणि कुटुंबात क्लेश होत नाही.
WD
वृषभ राशीच्या जातकांनी गणपतीला पाच प्रकारच्या लाडवांच्या नवैद्य दाखवावा. असे केल्याने धन-धान्य व भौतिक सुखात वृद्धी होते.
WD
मिथुन राशीच्या जातकांनी गणपतीच्या मूर्तीवर कच्चे दूध अर्पित केल्याने घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते.
WD
कर्क राशीच्या लोकांना आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी गणपतीला दूर्वा व्हायला पाहिजे. असे केल्याने सर्व प्रकारचे शारीरिक व्याधी दूर होण्यास मदत मिळेल.
WD
सिंह राशीच्या लोकांनी जर मंदिरात स्फटिकच्या गणपतीची स्थापना केली तर त्यांची समाजात मान-मर्यादा वाढेल.
WD
कन्या राशीच्या लोकांनी गणपतीला कच्चे दूध आणि शेंदूर अर्पित केला पाहिजे. असे केल्याने त्यांना व्यवसायातिल सर्व अडचणींपासून नक्कीच सुटकारा मिळेल. तसेच पारिवारिक समस्या देखील दूर होतील.
WD
तुला राशीच्या जातकांनी आंब्याच्या पानांनी गणपतीची पूजा केली पाहिजे. असे केल्याने ते स्वत: व पारिवारिक सदस्य रोगमुक्त होतील.
WD
वृश्चिक राशीच्या लोकांनी समस्त कष्टांपासून सुटकारा मिळविण्यासाठी गणपतीला गूळ, साखर, व दह्याचा नवैद्य लावावा.
WD
धनू राशीच्या लोकांनी गणपतीचा पंचामृताने अभिषेक केला पाहिजे. असे केल्याने घरातील आर्थिक कष्ट दूर होतात.
WD
मकर राशीच्या जातकांनी तांब्याच्या नाण्याला काळा दोरा बांधून गणपतीला अर्पित केले तर नक्कीच त्यांना धनलाभ होईल.
WD
कुंभ राशीच्या लोकांनी गणपतीला गुलाबाचे फूल व्हायला पाहिजे, जर कुणी व्यक्ती संतानं सुखाची कामना करत असेल तर हा फारच कारगार उपाय आहे.
WD
मीन राशीच्या जातकाने नोकरी, व्यापारामध्ये लाभ मिळविण्यासाठी पिवळा रेशमी कापड गणपतीला चढवायला पाहिजे.