इचलकरंजी गणेश विसर्जन वाद चिघळणाची शक्यता,नदीत गणेश विसर्जन करता येणार नाही असा आदेश उच्च न्यायालय

शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (15:12 IST)
गणेश मुर्तीचे विसर्जन इचलकरंजीत पंचगंगा नदीत वाहत्या पाण्यात करा अशी ठाम मागणी आमदार प्रकाश आवाडे आणि हिंदुत्ववादी संघटनेनी केली आहे. मात्र पंचगंगा नदीत गणेश विसर्जन करता येणार नाही असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. विनाकारण चुकीच्या संकल्पना पसरवू नका असे आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी देखील पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे इचलकरंजी गणेश विसर्जन वाद चिघळणाची शक्यता आहे.
 
पंचगंगा नदीतील प्रधूषण कमी व्हावे यासाठी दरवर्षी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते. यासाठी शहरात ठिकठिकाणी मोठाले कुंड ठेवले आहेत. प्लास्टर व रासायनिक रंगामुळे नदीचे प्रदूषण होते, हें प्रदूषण रोखण्यासाठी कुंडात विसर्जन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे. तसेच इचलकरंजीमध्ये गणेश विसर्जनासाठी शेततळी निर्माण केली असून, गणेश भक्तांनी सहकार्य करावे असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र वाहत्या पाण्यातचं विसर्जन करावे अशी भूमिका आवाडेंनी घेतली आहे. त्यामुळे इचलकरंजी गणेश विसर्जन वाद चिघळणाची शक्यता नाकारता येत नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती