मुंबईच्या धैर्याला बॉलीवूडचा सलाम!

वेबदुनिया

सोमवार, 23 नोव्हेंबर 2009 (18:50 IST)
ND
ND
मुंबईत 26/11 ला झालेल्या हल्ल्याने नेहमीच ताजे-टवटवीत असणारे बॉलीवूडही हादरले. म्हणूनच या घटनेनंतर आपले ग्लॅमर बाजूला फेकत ही मंडळी मदतीसाठी पुढे सरसावली होती. आता या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत असताना बॉलीवूड पुन्हा एकदा कर्तव्याला जागले आहे.

26/11 च्या काळात आणि त्यानंतरही मुंबईकरांनी दाखविलेल्या धैर्याला सलाम करण्यासाठी एक गीत तयार करण्यात आले आहे. यात अनेक गायकांसोबत महानायक अमिताभ बच्चननेही आवाज दिला आहे. यातून या हल्ल्यात मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

बिग बीला या गाण्याविषयी सांगितले त्यावेळी ते लगेचच तयार झाले. 'बिग बी'चे मुंबईवर अपार प्रेम आहेच. त्यामुळेच संकट आल्यानंतर मुंबई कोसळत नाही, चालत रहाते. हेच मुंबईचे स्पिरीट आहे, असे ते मानतात.

साऊंड ऑफ पीस नावाचा हा अल्बम या निमित्ताने तयार होतो आहे. त्याचे संगीत आदेश श्रीवास्तव यांनी दिले आहे. यात जागतिक दहशतवादावर टिप्पणी करण्यात आली आहे. अमिताभशिवाय सोनू निगम, हरिहरन, कैलाश खेर, सुरेश वाडकर, जगजीत सिंह, सुनीधी चौहान, शंकर महादेवन, रशिद खान, अलका याज्ञिक यांच्यासह अनेकांनी त्यासाठी आवाज दिला आहे.

या गीताचा व्हिडीयोही तयार करण्यात येत असून त्यात मुंबई हल्ल्यासोबतच अमेरिकेतील 9/11 चा हल्ला आणि लंडन स्फोटाची क्लिपिंग्ज दाखवली जाणार आहे.

वेबदुनिया वर वाचा