Review: 'सचिन: अ बिलियन ड्रीम्स'

शुक्रवार, 26 मे 2017 (14:03 IST)
सचिन तेंडुलकराचे नाव येता समोर मास्टर ब्लास्टरचे चित्र समोर येते जो गोलंदाजांची जोरदार धुनाई करतो, पण त्याच सचिनची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफकडे घेऊन जाते 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'. कसे तयार झाले हे चित्रपट, जाणून घ्या....
 
कथा 
ही कथा आहे महाराष्ट्राचे मराठी उपन्यासकार रमेश तेंडुलकर यांचा घरी जन्म घेणार्‍या सचिन (सचिन तेंडुलकर)ची आहे. ज्याचा जन्म  दादरच्या एका नर्सिंग होम झाला होता. तेथूनच मास्टरची लाईफ जर्नीची सुरुवात होते. बालपणी शिवाजी पार्कमध्ये प्रॅक्टिस करणे, गुरु आचरेकर यांच्या द्वारे क्रिकेटची ट्रेनिंग घेणे आणि नंतर लहानपणाचे स्वप्न बघत बघत पुढे जाणे. एवढंच नव्हे पहिला वन डे, क्रिकेटमध्ये निंदा, पहिले शतक, कॉन्ट्रोवर्सी सारख्या सर्व बिंदूंबरोबर जीवनात अंजली आणि दोन मुलांचे येणे आणि नंतर क्रिकेटला अलविदा म्हणणे.... हे सर्व या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.  
 
डायरेक्शन
चित्रपटाचे डायरेक्शन कमालीचे आहे आणि वेग वेगळ्या दृश्यांना दाखवण्यासाठी नाट्य रूपांतरणासोबत रियल लोकांना फारच अचूक अंदाजात दाखवण्यात आले आहे. जे तुम्हाला पूर्ण चित्रपटात व्यस्त ठेवतो. चित्रपटाची कथा तर तुम्हाला विकिपीडियामध्ये 60 टक्के मिळूनच जाते पण स्क्रीनप्लेसोबत सांगण्याचा अंदाज देखील दिलचस्प आहे. सचिनला आपल्या क्रिकेटच्या मैदानात किंवा वेग वेगळ्या सभांमध्ये बघितले असेल, पण वास्तविकता काय आहे, याला फारच उत्तम पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात बरेच कधी न बघितलेले व्हिडिओज देखील बघायला मिळाले आहे.  
 
स्टारकास्टची परफॉर्मेंस 
तसे तर नाट्य रूपांतरणच्या कलाकारांनी फारच उत्तम काम केले आहे आणि खर्‍या जीवनातील लोक अर्थात वीरेंद्र सहवाग, धोनी, रवि शास्त्री, सचिन, अंजली, सारा आणि अर्जुनचे पिक्चरायझेशन फारच दिलचस्प आहे. अमिताभ बच्चन, हर्षा भोगले, वीरेंद्र सहवाग यांचे देखील उत्तम अपीयरेंस आहे.  
 
म्युझिक  
चित्रपटाचे संगीत आणि बॅकग्राऊंड स्कोर चांगला आहे आणि वेळे वेळेवर फारच मोटिवेट करताना दिसतो.  
 
बघावे की नाही
जर तुम्ही क्रिकेटचे दिवाने असार आणि मास्टर ब्लास्टर सचिनच्या खर्‍या जीवनाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हे चित्रपट नक्कीच बघावे.  
 
Genre: बायोपिक
Director: जेम्स एर्स्किन
Plot:         सचिन तेंडुलकरच्या लाईफ स्टोरीला चित्रपटात दर्शवण्यात आले आहे.  
फिल्म 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'
रेटिंग 3.5/5
स्टार कास्ट सचिन तेंडुलकर, अर्जुन तेंडुलकर, सारा तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग
डायरेक्टर जेम्स एर्स्किन
प्रोड्यूसर कार्निवाल मोशन पिक्चर्स, रवि भागचंड्का
म्यूजिक एआर रहमान
जॉनर बायोपिक

वेबदुनिया वर वाचा