Movie Review: दमदार अॅक्टिंग आणि शानदार डायरेक्शनसाठी बघा 'वजीर'

शुक्रवार, 8 जानेवारी 2016 (12:44 IST)
चित्रपटाचे नाव   वजीर

क्रिटिक रेटिंग

3.5

स्टार कास्ट

 
अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, अदिति राव हैदरी
आणि नील नितिन मुकेश

डायरेक्टर

बिजॉय नांबियार

प्रोड्यूसर

विधु विनोद चोपड़ा

म्युझिक डायरेक्टर

अंकित तिवारी, रोचक कोहली
जॉनर एक्शन-थ्रिलर


हे चित्रपट नवीन वर्षाचे पहिले बिग रिलीज आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उमेद जास्त लागली आहे. चित्रपटाची कथा डिसेबल चेस मास्टर पंडित जी (अमिताभ बच्चन) आणि एटीएस ऑफिसर दानिश अलीच्या आजू बाजू फिरत आहे. चित्रपट दानिशच्या लाईफपासून सुरू होते, ज्याने दहशतवाद्याशी लढत आपल्या मुलीला गमावले. यामुळे दानिश आणि त्याची बायको रुहाना (अदिति)दरम्यान दुरावा निर्माण होतो. दुसरीकडे पंडित (अमिताभ) यांना मुलीच्या मृत्यूचे कारण जाणून घ्यायचे आहे आणि त्यासाठी ते दानिशची मदत घेतात. येथून यांच्या मैत्रीची सुरुवात होते आणि कथेत नवीन वळण येतं.  
 
अॅक्टिंग  
चित्रपटात सर्वांनी जोरदार काम केले आहे. पंडित जीच्या भूमिकेत व्हील चेयरवर बसलेले बिग बी एकदम नॅचरल दिसत आहे. आपल्या मुलीच्या न्यायासाठी वाट बघत पिता, एक चांगला मित्र आणि एक ब्रिलियंट चेस मास्टर, या सर्व इमोशन्सला अमिताभाने एकाच भूमिकेत फारच उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. एटीएस ऑफिसर दानिशच्या भूमिकेत फरहान बिलकुल फिट आहे. खासकर अॅक्शन सीन्समध्ये त्याची बॉडी लँग्वेज पाहण्यासारखी आहे. चित्रपटात विलेनची भूमिका साकारणारा नील नीतिन मुकेश तुम्हाला नक्कीच आश्चर्यात टाकतो. पण त्याचे चित्रपटात फारच कमी सीन्स आहे. पण या सीन्समध्ये तो सर्वांवर भारी पडत आहे. रुहानाच्या भूमिकेत अदिती राव हैदरीने पण चांगली अॅक्टिंग केली आहे. आर्मी ऑफिसरच्या कॅमियो रोलमध्ये जॉन अब्राहमजवळ करण्यासाठी काही विशेष नव्हते.  
 
डायलॉग
चित्रपटाचे डायलॉग अभिजित देशपांडे यांनी लिहिले आहे, जे बॉलीवूडचे टिपीकल, घिसे-पिटे डायलॉग्सपेक्षा वेगळे आहे. ये डायलॉग्स तुम्हाला बिग बीच्या 70च्या चित्रपटांची आठवण करून देतील.  
 
कथा  
चित्रपटाची कथा विधु विनोद चोप्रा आणि अभिजात जोशी यांनी लिहिले आहे. थ्रिलर चित्रपट असल्यामुळे जर तुम्हाला ‘वजीर’हून फार जास्त उमेद असेल तर तुम्हाला सांगायचे म्हणजे या चित्रपटाची कथा फारच सादी आहे. पण चित्रपटाच्या शेवटी एक मोठे ट्विस्ट आहे ज्यामुळे तुम्हाला पूर्ण चित्रपटात बघायला आवडेल.  
 
डायरेक्शन  
जर आपण डायरेक्शनची गोष्ट करू तर आपण बिजॉयची ‘डेविड’ आणि ‘शैतान’सारखे चित्रपट बघितले असतील, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही की ‘वजीर’चे डायरेक्शन देखील बिजॉय यांनी केले आहे. चित्रपटाचे ट्रीटमेंट त्यांच्या मागील चित्रपटापेक्षा वेगळे आहे जे ऑडियंसला नक्कीच पसंत पडेल.  
 
म्युझिक  
चित्रपटाचे सर्व गाणे उत्तम आहे. ‘तेरे बिन’, ‘अंतरंगी यारी’ आणि ‘मौला’ साँग तर लोकांच्या तोंडावर आहे. चित्रपटाचा बॅकग्राऊंड साउंड देखील कमालीचा आहे.  
 
बघावे की नाही  
एकूण जर तुम्हाला पडद्यावर चांगले परफॉर्मेंसेज बघायचे असतील तर हे चित्रपट बघायला विसरू नका. जर तुम्ही फक्त थ्रिलरची अपेक्षा करत असाल तर हे चित्रपट त्यापेक्षा जास्त चांगला आहे.

वृत्त जगत

आरोग्य

हिंदू

मनोरंजन

मराठी ज्योतिष

क्रीडा