चित्रपट - टोटल धमाल (Total Dhamaal)
स्टार कास्ट: अजय देवगण, माधुरी दीक्षित, अरशद वारसी, जावेद जाफरी, अनिल कपूर, रीतेश देशमुख, ईशा गुप्ता इत्यादी.
निर्देशक: इंद्र कुमार
निर्माता: फॉक्स स्टार, अजय देवगण फिल्म्स, इंद्र कुमार, अधिकारी ब्रदर्स इत्यादी.
एखाद्या मोठ्या चित्रपटाचे फ्रेंचाइजी बनणे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही आहे. कारण चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या अपेक्षा जुळलेल्या असतात. म्हणूनच आता असा ट्रेड बनला आहे की जर एखादे चित्रपट हिट झाले तर त्याचे सीक्वल जरूर बनतात. पण हे काही गरजेचे नाही की सीक्वलमध्येपण तेवढेच मनोरंजन असेल जेवढे पहिल्या भागत होते. काही असेच इंद्र कुमार द्वारे निर्देशित चित्रपट टोटल धमालसोबत झाले आहे.
टोटल धमालमध्ये धमाल तर आहे, पण तेवढेच कन्फ्यूजनपण आहे. इंटरवलपर्यंत सर्व पात्रांची ओळख करवण्यात आणि त्यांना स्थापित करण्यातच वेळ निघून जातो. आणि चित्रपट पूर्णपणे थकवणारा वाटू लागतो. इंटरवलपर्यंत बहुतेकच असा कोणता डायलॉग असेल ज्यावर तुम्ही हसू शकता. इंटरवलपर्यंत चित्रपट फारच थकवणारा आहे. इंटरवलनंतर वाटत की सेकंड हाफमध्ये चित्रपट समजेल पण चित्रपटाची गतीत मनोरंजन कुठेतरी हरवलं आहे.
सिनेमा हॉलमध्ये बसणार्या लोकांना समजत नव्हते की हसणे कुठे आहे ? किमान अर्धा दर्जन कलाकार हसवण्याच्या प्रयत्नात असतात. पण त्यांचे पंच पूर्णपणे बेदम साबीत झाले आणि हे निश्चितच एका निर्देशकाचे अपयश म्हणू आपण. तसं तर चित्रपटात ग्रेड प्रॉडक्शन वैल्यू आहे. फार मोठ्या प्रमाणात चित्रपटाला शूट करण्यात आले आहे. फॅशन भी एग्जॉटिक आहे, पण रायटिंग डिपार्टमेंट आणि ऍक्शन टीम या स्टार्सच्या प्रयत्नांना कमी करताना दिसले. पूर्ण चित्रपटात जावेद जाफरी, संजय मिश्राच्या पंचायतशिवाय हसण्याचा मोका तुम्हाला शोधावा लागेल.
अभिनयाची गोष्ट केली तर अजय देवगण, जावेद जाफरी, संजय मिश्रा, रितेश देशमुख आपापल्या भूमिकेत दिसत आहे. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूरला पडद्यावर एकत्र बघणे सुखद वाटते. इतर गोष्टींबद्दल बोलणे झाले तर चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी कमालची आहे. चित्रपटाची एडिटिंग फारच कमजोर आहे.