चित्रपट परीक्षण : शादी के साईड इफेक्टस्

सोमवार, 3 मार्च 2014 (18:50 IST)
‘शादी के साईड इफेक्टस्’ ही विवाहित दोन जीवांची कहाणी आहे. लग्नानंतर सुरू झालेल्या संसारात घडणार्‍या काही हास्यास्पद घटनांवर 
 
हा चित्रपट आधारित आहे. सिद्धार्थ रॉय उर्फ सिड (फरहान अख्तर) आणि तृषा म्हणजेच विद्या बालन हे एक सुखी कुटुंब आहे. एकेदिवशी 
 
लक्षात येतं की, तृषा गर्भवती आहे, ही बाब दोघांनाही आवडत नाही. सिड एक संगीतकार तर तृषा नोकरी करते, यामुळे गर्भपात 
 
करण्याच्या विचारात ते असतात. कारण दोन्हीही जणांची मुलासाठी तयारी नसते, मात्र नंतर ते आपला निर्णय बदलतात. 
 
या परिवारात मिलीचा जन्म होता. मात्र तिच्या देखभालीत तृषाला आपली नोकरी सोडावी लागते, आणि ती सर्वकाही अपेक्षा सिडकडून 
 
करते, म्हणून सिडही चिंतेत असतो, सिडने मुलीकडेही संपूर्णपणे लक्ष द्यावं, बरोबरीची साथ द्यावी अशी अपेक्षा तृषाची असते. तृषा आणि 
 
सिडचं हे संसाराचं राहट गाडगं पुढे कसं चालतं, त्यांच्यात काय-काय गैरसमज होतात, आणि पुढे काय होतं, ही या चित्रपटाची पुढची 
 
कहाणी आहे, तसेच हा चित्रपट तसा पाहण्यासारखा असल्याचं सांगण्यात येतंय.

वेबदुनिया वर वाचा