Baahubali 2 Movie Review : ‘बाहुबली 2’ चित्रपट परीक्षण

शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (14:00 IST)
‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं…?’ याचं उत्तर शोधण्याच्या उत्साहात ‘बाहुबली २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बाहुबलीचा पहिला भाग जिथे संपतो, बाहुबली 2 तिथूनच सुरू होते. सुरुवातीला एक रिकॅपद्वारे दर्शकांना पहिल्या भागाचा संक्षिप्त परिचय दिला जातो. आता ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी प्रेक्षकांनी एवढी वाट बघितली ते उत्तर मिळालेल्या मजा आला नाही असे वाटायला नको म्हणून सस्पेंस निर्माण केले गेले आहे आणि इंटरवलनंतर याचे उत्तर मिळाल्यावर लोकांना राहत मिळेल कारण तोपर्यंत त्यांचे भरपूर मनोरंजन झालेले असतात.
राजामौलीने बाहुबलीला विश्वसनीय पात्र बनवण्यात काही कमी सोडलेली नाही. हत्ती समान ताकद, चित्त्यासारखी फूर्ती, गिधाडसारखी नजर असलेला बाहुबली जेव्हा वीजेच्या गतीप्रमाणे शत्रूवर वार करतो तर पापण्या उघडझाप करेपर्यंत तर शत्रूची मान धडापासून वेगळी पडलेली असते. पण हे सर्व अनुभवण्यासाठी बाहुबलीचा पहिला भाग बघितलेला असावा.
 
कहाणीचे प्रस्तुतीकरण प्रशंसनीय आहे. स्क्रिप्ट उत्तम आहे आणि अनेक दृश्यांवर टाळ्या ऐकू येतात. राजमाता आणि बाहुबली यांच्यातील नाते, कट्टपा आणि बाहुबली यांच्यातील दृश्यही मनोरंजक आहे. कट्टपाचे बाहुबलीला झोपण्यासाठी लोरी गाणे, देवसेनेसमोर बाहुबलीचे मंदबुद्धी असल्याचे नाटक करणे आणि इतर काही दृश्य मनोरंजन करतात. देवसेनेची एंट्रीची जोरदार असून पूर्ण सिनेमात ऍक्शन सीक्वेंस शानदार आहेत. या सिनेमाची ग्राफिक्सदेखील पहिल्या भागापेक्षा उत्तम आहे.
 
मध्यांतर पर्यंत कहाणी मनोरंजक आहे नंतर ड्राम सुरू होतो आणि क्लाइमॅक्समध्ये अॅक्शन हावी होतं. दिग्दर्शकाची सिनेमावर चांगली पकड दिसून येते. कॉमेडी, अॅक्शन, रोमांस आणि ड्रामा यात संतुलन राखून प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरं उतरण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला आहे. 
 
प्रभाष म्हणजे बाहुबली, त्याचा गर्व, ताकद, हुशारी, शौर्य, प्रेम, समर्पण, सहजता ये सर्व त्याच्या भूमिकेत उत्तमरीत्या दिसून येतं. देवसेनाच्या रूपात अनुष्का शेट्टीने स्वत:ला सिद्ध केले आहे. भल्लाल देवच्या रूपात राणा दग्गुबाती याने आपल्या अभिनयाची ताकद दर्शवली आहे. शिवगामीच्या रूपात रम्या कृष्णनचे अभिनय शानदार आहे. सत्यराज अर्थात कटप्पाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि त्याला दर्शकांचे भरपूर प्रेमही मिळाले. तमन्ना भाटियासाठी काही विशेष नव्हतं. नासेर प्रभाव सोडतो. 
 
सिनेमाची वीएफएक्स टीम बधाई पात्र आहे. चित्रपटात वीएफएक्सचा भरमसाट उपयोग करण्यात आला आहे. आपल्या कामात त्यांनी हॉलिवूडच्या स्तरावर रिजल्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमातील गाणी कर्णप्रिय नसली तरी सिनेमाची पकड त्यावर दुर्लक्ष करायला भाग पाडते. गीत-संगीत सिनेमाचा कमजोर पक्ष आहे असे म्हटले तरी चालेल.
 
भव्य सेट, वेशभूषा, अलंकार, कलाकारांचे अभिनय, रुबाबदार साम्राज्य, तेथील थाट या सर्वांचे सुंदर चित्रण या चित्रपटाची मजबूत बाजू असनू यासाठी राजामौलींनी बरीच मेहनत घेतलेली दिसून येते. एकूण चित्रपट निश्चितच बघण्यायोग्य आहे. कारणही ब्लॉकबस्टर मूव्ही आहे.

वेबदुनिया वर वाचा