‘तेवर’ : चित्रपट परीक्षण

सोमवार, 12 जानेवारी 2015 (14:52 IST)
नव्या वर्षात प्रदर्शित झालेला पहिला सिनेमा म्हणून ‘तेवर’कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा स्वाभाविक आहेत. ‘तेवर’ हा एका दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असला तरी त्याच्या तगडय़ा आणि यंग स्टारकास्टमुळेही तो खूप चर्चिला गेला. या सिनेमाच्या निमित्तानं सोनाक्षी सिन्हा आणि अजरुन कपूर ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसतेय.
 
ही कहाणी आहे एका पोलीस अधिकार्‍याचा (राज बब्बर) मुलगा पिंटूची (अर्जुन कपूर) .. पिंटूला नको त्या भानगडीत पडण्याची भारी सवय.. आणि यामुळेच त्याची ओळख राधिकाशी (सोनाक्षी सिन्हा) होते.. एक दबंग नेता गजेंद्र (मनोज वाजपेयी) राधिकावर एकतर्फी प्रेम करतोय.. राधिकाची ओळख पिंटूशी होते आणि ‘सलमानचा फॅन’ असलेला पिंटू गजेंद्रशी दोन हात करण्यासाठी तयार होतो.. आणि मग अनेकदा दिसून येत असलेला बॉलिवूडमधला मसाला कथेत आपसूकच टाकला जातो. 
 
सोनाक्षीच्या बाबतीत म्हणायचं तर सोनाक्षीला आपण यापूर्वी अशा भूमिकांमध्ये पाहिल्याचं आपल्याला जाणवत राहतं.. सोनाक्षीला आपल्या भूमिकांमध्ये चोखंदळपणा आणण्याची गरज आहे. एकाच पद्धतीची अँक्टिंग आणि अँटीटय़ूड दिसून येतोय. राहिली गोष्ट मनोज वाजपेयीची.. तर मनोजनं या सिनेमात कमाल केलीय.. एका दबंग राजकारण्याच्या भूमिकेत आपण त्याला यापूर्वीही पाहिलं असेल तरी त्याची ही भूमिकाही वेगळी वाटते. त्याची डायलॉग्ज सादर करण्याची पद्धतही कमालीची आहे. त्याची भूमिका अनेकांच्या लक्षात राहण्यासारखी आहे.

वेबदुनिया वर वाचा