हायवे : आत्मशोधाच्या वाटसरूंची कहाणी

WD
इम्तियाझ अली असं म्हटल्यावर त्याचा सिनेमा, त्याचे विषय, त्याची मांडणी अन् त्याची पात्रं या सार्‍या गोष्टींबद्दल एक वेगळंच कुतूहल असतं. हायवेच्या बद्दल बोलायचं तर हा सिनेमा वेगळ्या जातकुळीतला आहे, इतकं ढोबळ विधान करून थांबता येत नाही, पदोपदी तो तुमच्या मनाचा वेध घेतो. उच्चभ्रू वर्गातील असणारी बीरा म्हणजे अलीया भट. आता घरून लग्नासाठी तिला जबरदस्त दबाव आहे.

पण मग तिला किडनॅप करण्याचा ठरवलेला प्लॅन. कारण तिला फियान्सेसोबत लग्नाअगोदर एक सिक्रेट ड्राइव्ह हवीय. म्हणून त्यासाठी किडनॅप होण्याचा प्लॅन अन् ते करणार महाबीर भट्टी म्हणजे रणबीर हुडा तो आहे गुंड. त्याची गँग आहे, तो गुंड आहे. भुरटा चोर नाही, हे गृहितक मान्य करायला लागतं. कारण चोर अथवा गुंड असं म्हटल्यावर आपल्यासमोर येणारा बलात्कार करू पाहणारा अन् पैशासाठी वाट्टेल ते करू पाहणारा असा हा गुंड नाहीय. आपण जिचं अपहरण केलंय, ही एका मोठय़ा घरातील एका पॉवरफुल कुटुंबातील मुलगी आहे, याची जाणीव झाल्यानंतर तो मागे हटत नाही, तो तिला घेऊन प्रवासाला निघतो. त्या प्रवासाची ही कहाणी आहे. कारण टप्प्याटप्प्यावर वळणा वळणावर आपल्याला आयुष्य कळत उमजत जाण्याची ही प्रक्रिया इम्तियाझने त्याची नजाकत राखत पटवून दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा