विचार करायला लावणारा दिल धडकने दो

सोमवार, 8 जून 2015 (12:09 IST)
झोया अख्तर ‘लक बाय चान्स’ आणि ‘जिंदगी न मिले दोबारा’ या चित्रपटांचे यशस्वी दिग्दर्शन केल्यानंतर आज ‘दिल धडकने दो’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. झोयाने या चित्रपटात पती-पत्नीच्या नात्यातील भावनिक, वैचारिक गुंफण सुरेखरीत्या मांडली असून उत्तम कलाकार आणि चांगली गाणी असली तरीही ‘जिंदगी’ची मजा यामध्ये नाही.
 
चित्रपटाची कथा मेहरा कुटुंबाभोवती ङ्खिरणारी आहे. कमल (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली छाया) हे पती-पत्नी आहेत. आयेशा (प्रियांका) आणि कबीर (रणवीर) ही त्यांची मुले आहेत. आयेशाचे लग्न मानवशी (राहुल बोस) झाले आहे, मात्र नात्यामध्ये इतका तणाव आहे, की विवाह तुटायला आला आहे. तर कबीर एकदम मस्त् मौला आहे. त्याला त्याचे आयुष्य कुठल्याही नियमात, बंधनात जगायचे नाही. वडील कमल मात्र प्रत्येक गोष्ट नियमाने जगतात, इतरांनीही आपल्या नियंत्रणात जगावे असा त्यांचा विचार असतो. कमल मेहरा लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी क्रुझवर देतात. या ट्रिपमध्ये आयेशाचा जुना मित्र सनी (फरहान) तिला भेटतो. तर रणवीरला फराह (अनुष्का) भेटते. फराह-कबीर एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर आयेशाही सनीकडे आकर्षिली जाते. यापुढे या चौघांचे काय होते ते चित्रपटात पाहण्यासारखे आहे.

वेबदुनिया वर वाचा