बेबी : चित्रपट परीक्षण

शनिवार, 24 जानेवारी 2015 (12:51 IST)
'बेबी' एक अंडरकव्हर युनिटचे नाव आहे. हे युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. 'अ वेडनस्डे' सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे पुन्हा एकदा दहशतवादावर आधारित सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. सिनेमाचे नाव 'बेबी' असून अक्षयकुमारने एक काऊंटर एजेन्टचे पात्र साकारले आहे. 
 
'बेबी' एक अंडरकव्हर युनिटचे नाव आहे, दहशतवादाला नष्ट करण्याचा त्यांच्या हेतू आहे. या युनिटचे मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी जबरदस्ती करतो. सिनेमात जिहादच्या मुद्दावर जास्त केंद्रित करण्यात आले आहे. अजय सिंह राजपूत मौलाना मोहम्मद रहमानद्वारा पसरल्या जाणार्‍या आतंकाला कसे थांबवतो, त्यासाठी त्याला कोण-कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते, 'बेबी'चे मिशन यशस्वी होते का? हे सर्व पाहण्यासाठी एकदा सिनेमा पाहावा लागेल. नीरज पांडे यांनी 'अ वेडनेस डे' आणि 'स्पेशल 26' नंतर पुन्हा एकदा सिद्ध केले, की बॉलिवूड उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. सिनेमाची कहाणी एका देशापासून दुसर्‍या देशापर्यंत (टर्कीपासून नेपाळ, नेपाळपासून अरबिया) फिरते. परंतु नीरज यांनी कोणताही देखावा न करता, सुंदररीत्या सादर केले. केवळ अक्षयच नाही इतर कलाकार डॅनी डेन्जोंगपा, अनुपम खेर, केके मेनन, तापसी पन्नू, सुशांत सिंह राजपूत आणि रशीद नाजनेसुद्धा आपला अभिनय उत्कृष्ट पार पाडला. 
 
बॅनर : टी-सीरिज सुपर कैसेट्स इंडस्ट्रीज लि., ए फ्रायडे फिल्मवर्क्स, क्राउचिंग टायगर मोशन पिक्चर्स, केप ऑफ गुड फिल्म्स
दिग्दर्शक : नीरज पांडे
संगीत : मीत ब्रदर्स
कलाकार : अक्षय कुमार, तापसी पन्नू, राणा दग्गुबाती, अनुपम खेर, डॅनी, केके मेनन, मधुरिमा टुली, रशीद नाज, सुशांत सिंह
सेंसर सर्टिफिकेट : यूए * 2 घंटे 39 मिनट 42 सेकंड्स
रेटिंग : 3/5

वेबदुनिया वर वाचा