चित्रपट परीक्षण : ‘HERO’ अँक्शन-रोमान्सच्या डायहार्ट लव्हर्सनी पाहावा

शनिवार, 12 सप्टेंबर 2015 (10:40 IST)
सूरज (सूरज पांचोली) एक गँगस्टर असून तो पोलिसांच्या चीफची मुलगी राधाला सुरक्षेचा बहाणा करुन तिचे अपहरण करतो आणि तिला शहराबाहेर घेऊन जातो. सिनेमाची कथा 1983 मध्ये रिलीज झालेल्या ‘हीरो’ या सिनेमावरुन घेण्यात आली आहे. सिनेमाचा फस्ट हाफ सूरज पांचोलीच्या अँक्शन सिक्वेन्सनी भरला आहे, तर सेकंड हाफमध्ये सूरजने इमोशनल कॅरेक्टर साकारले आहे. अँक्शन करताना सूरज एखाद्या माचो मॅनप्रमाणे दिसतो. त्याने आपल्या बॉडीवर घेतलेली मेहनत पडद्यावर स्पष्ट दिसते. सिनेमातील अनेक अँक्शन सीन्स बॉडी डबलचा वापर न करता सूरजने स्वत: केले आहेत.

अथियाने या सिनेमात राधा हे पात्र साकारले आहे. अनेक ठिकाणी अथियाला बघताना सोनम कपूरची आठवण होते. सूरज आणि अथियाची ऑनस्क्रिन केमिस्ट्री इम्प्रेसिव आहे. सिनेमाच्या शूटिंगच्या काळात सूरज जिया खान आत्महत्या प्रकरणामुळे खूप डिस्टर्ब होता. त्याचा परिणाम त्याच्या इमोशनल सीन्समध्ये दिसून येतो. सिनेमाची स्क्रिप्ट जुन्या हीरोवर आधारित आहे. त्यामुळे या सिनेमात नावीन्य असे काही नाही. निखिल अडवाणी यांनी सिनेमात नावीन्य आणण्याचा प्रयत्न केलेला नाही. सिनेमाचा फस्ट हाफ प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. तर सेकंड हाफ खूप मोठा आहे.

आदित्य पांचोलीने या सिनेमात पाशा हे पात्र साकारले आहे. तर तिग्मांशू धुलिया, शरद केळकर, अनिता हसनंदानी यांनी त्यांच्या वाटय़ाला आलेल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सिनेमाच्या शेवटची हीरोच्या ट्रॅकवर झालेली सलमान खानची एन्ट्री प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवते. नवोदित सूरज पांचोली आणि अथिया यांनी चांगला अभिनय केला आहे. दोघांची केमिस्ट्री क्यूट आहे. जर तुम्ही अँक्शन आणि रोमान्सचे डायहार्ट लव्हर असाल, तर हा सिनेमा नक्की बघा.

वेबदुनिया वर वाचा