चित्रपट परीक्षण : रामन राघव 2.0

सोमवार, 27 जून 2016 (11:32 IST)
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या रामन राघव 2.0 या सिनेमाच्या नावावरुन तुम्हाला नक्की वाटत असेल की हा सिनेमा मिड 60’s मध्ये घडलेल्या रामन राघव या सिरियल किल्लरवर आधारित आहे, तर तसं नाही. हो पण हा सिनेमा नक्की त्या सिरियल किल्लर रामन राघवशी प्रेरित आहे. ही गोष्ट आहे एका लॉ मेकर आणि लॉ ब्रेकरची. लॉ ब्रेकर अर्थातच रमन्ना जी व्यक्तिरेखा साकारली आहे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने. 
 
रमन्ना एक साईकोपाथ किल्लर आहे, मर्डर करण्यात त्याला एक वेगळंच समाधान लाभतं. जवळ जवळ नऊ हत्या केल्यानंतर तो पोलिसांकडे जाऊन स्वत:ला सरेंडर करतो. पोलीस मात्र त्याला वेडा समजून त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. दुसरीकडे राघवन जो एक पोलीस ऑफिसर असून, नशेचा शिकारी आहे, आपल्या गर्लफ्रेन्ड सीमीसोबत राहतोय. एकीकडे रमन्ना मर्डरवर मर्डर करत फिरतोय, तर दुसरीकडे राघवन त्याचा पाठलाग करत राहतो. अशा काहीशा पाश्र्वभूमीवरचा हा सिनेमा आहे. रमन राघव 2.0 या सिनेमाचा पूर्वार्ध क्लास झालाय. 
 
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा अभिनय कमाल झालाय. आपल्या नॅचरल अँक्टिंगच्या जिवावर त्यानं पुन्हा एकदा बाजी मारलीये. अभिनेता विक्की कौशलनं ही आपली भूमिका चोख पार पाडली आहे. सिनेमाचा उत्तरार्ध थोडा स्लो आहे. ती स्पीड अचानक कुठेतर हरवतो. मात्र दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या जबरदस्त मांडणीमुळे सिनेमा जिवंत राहतो. 
 
रामन राघवचे लोकेशन्स, सिनेमातले संवाद, कलाकारांचे परफॉर्मन्स या गोष्टींमुळे सिनेमा आणखी रिअलीस्टिक वाटतो. 

वेबदुनिया वर वाचा