नीरजाची कथा

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2016 (16:49 IST)
बॅनर : फॉक्स स्टार स्टुडियोज, ब्लिंग अनप्लग्ड
निर्माता : अतुल कस्बेकर
निर्देशक : राम माधवानी 
संगीत : विशाल खुराना
कलाकार : सोनम कपूर, शबाना आज़मी‍, शेखर रावजिआनी
रिलीज डेट : 19 फेब्रुवारी 2016 
 
अशोक चक्र प्राप्त फ्लाईट अटेंडेंट नीरजा भनोटच्या जीवनावर 'नीरजा' चित्रपट आधारित आहे. ही भूमिका सोनम कपूरने अभिनित केली आहे. 7 सप्टेंबर 1963ला चंडीगडमध्ये जन्म घेणारी नीरजाने काही दिवस मॉडलिंग करून 1985मध्ये अरेंज मॅरिज केले. हुंड्याच्या  मागणीमुळे तिला लग्नाचा चांगला अनुभव आला नाही आणि ती आपल्या आई वडिलांकडे मुंबईला परतली. तिने पॅन एममध्ये फ्लाईट अटेंडेंटची नोकरीसाठी आवेदन केले आणि त्यात तिची निवड झाली.   
 
पॅन एम फ्लाईट 73, ज्यात निरजा परवशांसोबत स्वार होती, ला अबू निदाल ऑर्गेनाइजेशन नावाच्या दहशत संगठनाच्या चार दहशतवाद्यांनी हायजॅक केले. नीरजाला सांगण्यात आले की तिने प्रवाशांचे पासपोर्ट एकत्र करून अमेरिकी नागरिकांची ओळख करावी. नीरजाने आपल्या सहकार्‍यांसोबत मिळून 41 अमेरिकी नागरिकांचे पासपोर्ट लपवले.   
 
17 तासानंतर हायजैकर्सने कराचीत विमानात विस्फोटकरून आग लावली. नीरजाने आपत्कालीन दार उघडले आणि यात्रेकरूंना बाहेर काढले. जर तिची इच्छा असते तर ती आधी निघू शकत होती पण तिने तसे केले नाही. जेव्हा नीरजाने दार उघडले तेव्हा दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. तीन मुलांना वाचवण्यासाठी निरजा पुढे आली आणि तिला गोळ्या लागला. 5 सप्टेंबर 1986रोजी 22 वर्षाच्या वयात नीरजाने या जगाला निरोप दिला.   
 
नीरजाची बहादुरीचे जगभरात प्रशंसा झाली. तिला अशोक चक्र अवॉर्ड देण्यात आले.

वेबदुनिया वर वाचा