फुटबॉल चाहत्यांचा कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. फुटबॉल विश्वचषकातील सामने पाहण्यासाठी तुम्ही सारे चाहते आसुसलेले असाल. महिनाभर तुम्ही रशियामध्येराहून फुटबॉल सामन्यांचा आनंद लुटायचा प्लॅन करत असाल, तर सावधान. कारण फुटबॉल विश्वचषकादरम्यान सायबर हल्ल्याचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.
रशियाबरोबर बर्याच देशांचे संबंध फारसे सलोख्याचे नाहीत. सायबर हल्ल्यांबाबत रशियाचे नाव काळ्या यादीत आहे. कारण ब्राझीलध्ये जेव्हा 2016 साली ऑलिम्पिक भरवण्यात आले होते, तेव्हा रशियाने जागतिक उत्तेजक द्रव्यविरोधी संघटनेच्या संगणकांवर सायबर हल्ला केला होता. रशियाने हा हल्ला केल्याचे सिद्धही झाले होते.
सध्याच्या घडीला रशियामध्ये एवढी मोठी स्पर्धा होत असताना त्यांचे शत्रू राष्ट्र आता सायबर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहेत. रशियातील प्रत्येक व्यक्तीवर पाहणी करण्यासाठी काही देश सक्रिय असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे रशियामध्ये जाणार्या चाहत्यांनी जपून राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.