घर व कार्यालयाची सजावट करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची शोभेची फुलझाडे उपलब्ध आहेत. त्यात 'लकी' बांबूला महत्त्वाचे स्थान आहे. घराच्या सौंदर्यात भर घालणारा 'लकी बांबू' उन्नती, सौभाग्याचेही प्रतीक मानला जातो.
-फेंगशुईनुसार घरातील पूर्वी आणि दक्षिण-पूर्वी कोपर्यात बांबूच्या रोपाला ठेवल्याने विशेष फायदा मिळतो. असे केल्याने धन, समृद्धी आणि उदंड आयुष्या सारखे बरेच फायदे मिळतात. म्हणून याला घरी ठेवणे फारच गरजेचे आहे.
-फेंगशुईत रोपांच्या संख्येचे विशेष महत्त्व असतो. चिनी फेंगशुई शास्त्रानुसार विषम संख्या असणारे पौधे लावल्याने घरात सुख आणि शांती मिळते. 3 बांबू आनंदासाठी, 5 बांबू धन आणि समृद्धीसाठी आणि 9 बांबू सौभाग्यासाठी शुभ मानले जातात. तरी देखील याला लाल रिबन आणि काचेच्या बरणीत घालून ठेवायला पाहिजे.