आपल्या आयुष्यात वडिलांची भूमिका खूप महत्वाची आहे. वडील आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात, त्यांना चांगले वाढवतात, त्यांना चांगल्या ठिकाणी शिक्षण देतात.जेणेकरुन मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात. अशा परिस्थितीत आपल्या वडिलांना विशेष मान देणे देखील मुलांचे कर्तव्य आहे.अशा परिस्थितीत आपण फादर्स डेच्या दिवशी वडिलांसाठी घरी काहीतरी करू शकता. कोरोना कालावधीमुळे,आपण घराबाहेर जाऊ इच्छित नसल्यास आपण घरी वडिलांसाठी काही गोष्टींची योजना आखू शकता.फादर्स डे दरवर्षी जूनच्या तिसर्या रविवारी साजरा केला जातो.यंदाच्या वर्षी हा रविवारी 20 जून रोजी साजरा केला जाणार आहे.आपण अशा प्रकारे आपल्या वडिलांना सरप्राईझ देऊ शकता. चला तर मग जाणून घ्या.
3 जुन्या आठवणी ताज्या करा-प्रत्येक व्यक्तीच्या आपल्या जुन्या आठवणी असतात,ज्यांच्याशी तो व्यक्ती जुडलेला असतो.अशाच प्रकारे आपण आपल्या वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.त्यांच्या जुन्या आठवणी ताजेतवाने करू शकता.या साठी त्यांचे जुने फोटो किंवा व्हिडियो एकत्र करून एक नवीन व्हिडीओ तयार करू शकता.आपले वडील हा व्हिडीओ बघून आनंदी होतील आणि त्यांना खूप खास वाटेल.
4 काही सरप्राईझ द्या- आपण आपल्या वडिलांसाठी घरातच काही सरप्राईझ देण्याची योजना आखू शकता.आपण त्यांच्यासाठी एखादी कविता लिहू शकता,एखाद्या गाण्यावर डान्स तयार करू शकता,त्यांच्यावर चारोळ्या लिहून त्यांना ते खास असल्याचा अनुभव देऊ शकता.तसेच आपण त्यांना काही भेटवस्तू देखील देऊ शकता.