नागपूरच्या धनतोलीतील टिळक विद्यालयाला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे 1921 साली ही शाळा सुरू झाली. स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणेतूनच या शाळेची स्थापन झाली होती. दादा धर्माधिकारी, श्री. दातार श्री. गाडगे, दामोदर कान्हेरे यांचा संस्थेच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग होता. त्यामुळेच स्वातंत्र्यसंग्रामातही शाळेने अप्रत्यक्षपणे भाग घेतला होता. अनेक स्वातंत्र्यवीरांनी त्या काळी येथे भूमिगत आश्रय घेतला होता.
नुसते शिक्षण नव्हे तर संस्कार करणे हे या शाळेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेचे अध्यक्ष व्हि. पी. जगदाळे सर यांनी सांगितले. शाळेचे सचिव राजीव देशपांडे तर खजिनदार आनंद जगदाळे आहेत. मराठी पहिली ते सातवीच्या मुख्याध्यापिका उषा जवादे तर इंग्रजीच्या मुख्याध्यापिका आदिती नाईक आहेत. मराठीच्या आठवी ते दहावीच्या मुख्याध्यापिका पेंढारकर मॅडम आहेत. शाळेतील मुलांची एकूण संख्या दीड हजार असून ती दोन शिफ्टमध्ये चालते.
शाळेत विद्यार्थ्यांचा कल आता इंग्रजीकडे वाढला आहे. 1971 इंग्रजी माध्यम सुरुवात झाली. आता इंग्रजी माध्यमाकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वळत असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.
शाळेत भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यावर भर दिला जातो. रामरक्षा, मनाचे श्लोकही शिकवले जातात. शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरही चमकदार कामगिरी केली आहे. मेरीटचे विद्यार्थी तयार न करता उत्कृष्ठ नागरिक घडवणे हेच आमचे उद्दीष्ट्य असल्याचे जगदाळे सरांनी सांगितले.
शाळेतली शिक्षिका चंदा रंजीत ठाकूर यांना नंदादीप पुरस्कार मिळाला आहे. 1777 पासून डॉय वसंतराव वानकर हे संस्थेचे आधारस्तंभ आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकीत डॉ. कुसुमताई वानकर मार्गदर्शिका आहेत. शाळेच्या या लौकीकामुळे अनेक राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी तिला भेट दिली आहे.