राजधानी दिल्लीत कॉग्रेस पुन्हा एकदा सत्तेवर आले असून, भारतीय जनता पार्टीने आपला पराभव मान्य करत हा निराशाजनक पराभव असल्याचे म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मागे टाकत पुन्हा एकदा कॉग्रेस सरकार सत्तेवर आले आहे. पराभव पराभव असतो आणि आम्ही हा पराभव स्वीकार करतो असे मत वेंकैय्या नायडू यांनी व्यक्त केले आहे.
भाजपच्या पराभवानंतर पत्रकारपरिषद घेत भारतीय जनता पार्टीने हा पराभव स्वीकार केला असून, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापण्याचा दावाही त्यांनी केला.