दिल्लीत तरूण उमेदवार द्यायचा होता: भाजप

भाषा

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (14:52 IST)
शिक्षा दिक्षितांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसकडून पराभूत झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी तरूण उमेदवार घोषित केला असता तर पक्षास फायदा झाला असता, असे भाजपने म्हटले आहे.

यासाठी अरूण जेटली योग्य उमेदवार ठरले असते, असे पक्षप्रवक्ते रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले. मात्र ही व्यक्तिगत प्रतिक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत भाजपने ७८ वर्षीय विजय कुमार मल्होत्रा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केले होते. विजय गोयल आणि हर्षवर्धन या मल्होत्रापेक्षा तरूण उमेदवारांना डावलण्यात आले होते.

वरिष्ठ उमेदवार दिल्यास पक्षातील बंडखोरीस पायबंद असेल, असा भाजपचा अंदाज होता.

वेबदुनिया वर वाचा