कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे विजय- भाजपा

वेबदुनिया

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (14:39 IST)
कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाने आणि शिवराज सिंह चव्हाण यांनी विकासकामे केल्यानेच मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते अनंत कुमार यांनी केला आहे.

मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीचे सरकार बनण्याचे निश्चित झाल्यानंतर आज पत्रकारपरिषदेत अनंत कुमार यांनी या विजयाचे सारे श्रेय प्रदेश कार्यकर्त्यांना दिले.

मध्य प्रदेशात गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीने केलेल्या विकास कामांना जनतेने पावती दिल्याचे कुमार म्हणाले.

आज संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक असल्याची माहिती अनंत कुमार यांनी या पत्रकारपरिषदेत दिली.

वेबदुनिया वर वाचा