राजस्थानमध्ये कॉग्रेसचा पक्षनेता कोण?

भाषा

सोमवार, 8 डिसेंबर 2008 (14:40 IST)
राजस्थान आणि मिझोरममध्ये सत्तेत परतणार्‍या कॉंग्रसने मुख्यमंत्रीपद कोण भूषवणार हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. पक्षात नेता निवडीची ठरलेली पद्धत आहे. याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही.

याबाबतचा अंतिम निर्णय कॉंग्रेसाध्यक्षाच घेतील, असे पक्षाचे प्रसारमाध्यम विभागाचे अध्यक्ष एम विरप्पा मोइली यांनी सांगितले. पक्षाने निवडणुकीच्या आखाड्यात कोणत्याही नेत्यास मुख्यमंत्रिपदासाठी सामोरे आणले नव्हते.

राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये अनुक्रमे अशोक गेहलोत आणि अजित जोगी यांनी प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते. शिला ‍दिक्षित यांनी दिल्लीत सलग तिसर्‍यांदा सत्तेत हॅट्रीक साधून इतिहास रचला आहे.

त्यांच्या करिष्माई नेतृत्वामुळेच पक्ष विजयी झाल्याने मुख्यमंत्रिपदी त्याच आरूढ होतील, अशी शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा