सतपीरदर्गा हे फक्त एक निमित्त आहे, खरा हेतू वक्फ कायद्याविरुद्ध दंगली भडकवणे आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा खुलासा
नाशिक मध्ये बेकायदेशीर सतपीर दर्गा हटवण्याचा मुद्द्यावरून नाशिक शहर तापले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले, शहरात दंगली घडवण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांनी कठोर कारवाई करून हा कट उधळून लावला आहे. ते छत्रपती संभाजी नगर मध्ये बोलत होते.
दोनच दिवसांपूर्वी, नाशिकमधील सतपीर दर्गा न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पाडली. पण त्याआधी, मध्यरात्री, 400 हून अधिक धार्मिक कट्टरपंथीयांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि जाळपोळ केली.
समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत 31 पोलिस जखमी झाले होते, परंतु पोलिसांनी वेळीच बळाचा वापर करून दंगल आटोक्यात आणली. AIMIM शहर अध्यक्ष मेहबूब शेख यांना अटक करण्यात आली आहे. अंदाजे 1,110 संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सतपीर दर्गा पाडण्याच्या बहाण्याने असामाजिक घटकांनी पोलिसांवर दगडफेक करून दंगल सुरू केली होती, परंतु पोलिसांनी वेळीच कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांचा कट उधळून लावला.