आज मंगळवारी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आहे. संपूर्ण भारतातून हे पाहता येणार आहे. आज दिसणारे हे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. हे चंद्रगहण जवळपास तीन तासांचे आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांचे आहे. मंगळवारी रात्री 1 वाजून 32 मिनिटांनी चंद्रग्रहण सुरू होईल आणि पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी संपणार आहे. भारतासोबतच अफगाणिस्तान, युरोप, तुर्की, इराण, इराक, सौदी अरब, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि अंटार्टिका येथे दिसणार आहे. शास्त्रांनुसार चंद्रग्रहणाचं वेध नऊ तास आधी सुरू होतात. त्यानुसार चंद्रग्रहणाचे वेध सुरू होण्याची वेळ मंगळवारी 16 जुलसला 8 वाजून 40 मिनिटांनी असेल. हे चंद्रग्रहण बुधवारी 01:31 वाजे पासून सुरू होऊन 04:29 वाजेपर्यंत राहणार आहे. भारतात आता पुढचे चंद्रग्रहण 26 मे 2021 दिसणार आहे.