Dussehra 2023 दसर्‍याच्या दिवशी नक्की करा ही 5 कामे, वर्षभर सुखी राहाल

Dussehra 2023 हिंदू पंचागानुसार विजयादशमी हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. असे मानले जाते की विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला होता. विजयादशमीला असत्यावर सत्याचा विजय झाला असे मानले जाते.
 
धार्मिक मान्यतेनुसार विजयादशमीच्या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि इंद्रजित यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. असे मानले जाते की या दिवसापासून वाईटाचा नाश करुन नवीन सुरुवात केली जाते. शास्त्रानुसार विजयादशमीच्या दिवशी जीवनात सुख-समृद्धीसाठी काही उपाय केले जातात. चला तर मग सविस्तर उपाय जाणून घेऊया.
 
रावण दहन शुभ मुहूर्त
विजयादशमीला रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार रावणाचा पुतळा दहन केल्याने अहंकारावर विजय मिळतो.
 
विजयादशमीला नीलकंठ पक्षी दर्शन
धार्मिक मान्यतेनुसार दसऱ्याच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला नीळकंठ पक्षी दिसल्यास ते खूप शुभ मानले जाते. कुठेतरी नीळकंठ पक्षी दिसल्यास प्रलंबित कामे पूर्ण होतात, असा समज आहे.
 
दसर्‍याला दान करावे
जर आपण आर्थिक समस्येने त्रस्त आहात तर दसऱ्याच्या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन ते स्वच्छ करा आणि मंदिरात काही वस्तू दान करा. जर तुमच्या जीवनात रोग आणि दुःखाने त्रास होत असेल तर ते दूर करण्यासाठी डोक्यावरुन नारळ ओवाळून रावण दहनाच्या आगीत टाका. असे केल्याने सर्व रोग आणि दुःख नाहीसे होतात.
 
गोकर्णाची पूजा
दसऱ्याच्या दिवशी गोकर्णच्या रोपाची पूजा केल्यास शत्रूपासून मुक्ती मिळू शकते. तसेच या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवू शकता.
 
शमीचे झाड
ज्योतिष शास्त्रानुसार जर कुडलीत शनि दोष असेल तर दरसर्‍याच्या दिवशी शमीच्या झाडाचे पूजन करावे. असे केल्याने लवकरच कष्टांपासून मुक्ती मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती