शाही लस्सी

ND
साहित्य : 250 ग्रॅम ‍दही, 100 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम बासुंदी, 1 चमचा बदाम व पिस्त्याचे काप, केशर काड्या, 1 चमचा गुलाब पाणी, बर्फ आवश्यकतेनुसार, सजावटीसाठी चांदीचा वर्ख.

कृती : सर्वप्रथम ब्लँडरने दही, साखर व बासुंदी मिसळून फिरवून घ्यावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार बर्फ टाकून पुन्हा एकदा फिरवावे. या मिश्रणाला एका भांड्यात काढून त्यात पिस्ता, बदाम टाकून एकजीव करावे. तयार लस्सीला चांदीच्या ग्लासात भरावे. गुलाबपाण्यात केशर काड्या टाकून प्रत्येत ग्लासमध्ये थोडं थोडं टाकावं. शाही लस्सी तयार आहे. या लस्सीला चांदीचा वर्ख लावून सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा