वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे गुळाचा वापर करा
ज्यांना वाढत्या वजनाची चिंता आहे त्यांच्यासाठी गुळाचा चहा अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. तांबे, पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त यांसारखे पोषक घटक गुळात आढळतात. जे शरीरासाठी आवश्यक घटक आहेत. तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात गुळाचा चहा समाविष्ट करू शकता, ते वजन कमी करण्यास मदत करू शकते.
कृती-
एका पातेल्यात पाणी घाला. उकळायला लागल्यावर त्यात गूळ, वेलची, ओवा आणि तुळशीची पाने टाका. आता हे मिश्रण चांगले उकळून घ्या. नंतर गाळून घ्या, दुपारच्या जेवणानंतर हा चहा प्या किंवा संध्याकाळी गुळाचा चहा देखील पिऊ शकता. या चहामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते.
दुधाचा चहा करायचा असल्यास -
साहित्य-
लवंग, वेलची, काळे मिरे, दालचीनी, आलं, गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या, तुळशीचे पानं, गुळ, सूंठ, तुळस, दूध, चहापत्ती, पाणी.
कृती-
गुळाचा चहा तयार करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यावर त्यात तुळशीचे पानं घाला. आता लवंग, वेलची, काळेमिरे, दालचीनी, आलं, सूंठ आणि गुलाबाच्या पाकळ्या कुटून घ्या. पाणी उकळल्यावर कुटलेला मसाला त्यात घालून द्या. नंतर यात चहापत्ती घालून उकळून घ्या आणि मग गुळ घाला. छान शिजल्यावर यात दूध मिसळून किमान सात ते दहा मिनिट शिजू द्या. गुळाचा चहा तयार आहे.